संदीप बांद्रेचिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लाेकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला असला तरी चिपळूणने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. दोन-चार फेऱ्या वगळता राऊत यांनी प्रत्येक फेरीत राणेंच्या विरोधात आघाडी घेतली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राऊत यांनी तब्बल १९,६२७ चे मताधिक्य घेतले. त्यामुळे या निवडणुकीत राऊत यांचा पराभव झाला असला तरी उद्धवसेनेने चिपळूण जिंकले आहे.मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्यांपैकी तिसऱ्या तसेच १४ ते १६ व्या फेरीत राणेंनी मताधिक्य घेतले. मात्र, त्या व्यतिरिक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत राऊत यांनी प्रत्येक फेरीत बाजी मारली. या मतदारसंघात राऊत यांना ७९,६१९ इतके मतदान झाले, तर राणेंना ५९,९९२ मतांवर समाधान मानावे लागले.
विजयाची कारणे
- सहानुभूतीची लाट
- सहानुभूतीच्या लाटेवर विनायक राऊत यांनी चिपळूणकरांचे मन जिंकले.
- चिपळुणात राऊत यांचा नियमित जनसंपर्क हाेता. त्यामुळे जनतेशी त्यांची चांगली नाळ जुळली हाेती. त्यामुळेच त्यांना मताधिक्य मिळाले.
- खासदार निधीतून केलेल्या विकासकामांची दखल घेतली गेली.
- उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दाखवलेल्या विश्वासाचा फायदा झाला.
- उद्धवसेनेसह अन्य मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी स्नेहाचे संबंध फायदेशीर ठरले.
सहानुभूतीची लाट

प्रचाराला उशिरा सुरुवात
- नारायण राणे यांच्या उमदेवारीची घाेषणा उशिराने करण्यात आली. त्यामुळे प्रचारालाही उशिराने सुरुवात झाली.
- मतदारसंघात नेतृत्व नसल्याने पदाधिकाऱ्यांची ताकद अपुरी पडली.
- मतदारांना खेचण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांची फाैज कमी पडली.
- महायुतीचे स्टार प्रचारक नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरकलेच नाहीत.
- मुस्लिम, बाैद्ध समाजातील मतदारांनी पाठ फिरवल्याने त्याचा परिणाम राणे यांच्या मतांवर झाला.