चिपळूण : तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने चिपळूण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. गेल्या २४ तासात तालुक्यात १९०.७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील वाशिष्ठी, शिवनदीने धाेक्याची पातळी गाठली आहे.
गेल्या दहा दिवसांत पावसाने चिपळूणकडे अक्षरशः पाठ फिरवली होती. एक - दोनवेळा पावसाच्या मोठ्या सरी वगळता चिपळूणमध्ये वातावरण स्वच्छ राहिले. उलट दिवसभर कडक ऊन्हाचे दर्शन होत होते. त्यामुळे शेतीची कामे पूर्णतः ठप्प झाली होती. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. परंतु, संततधार पाऊस पडल्याने येथील वाशिष्ठी व शिवनदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे येथील व्यापारी धास्तावून गेले आहेत. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अनेक ठिकाणे चिखलाचे पाणी आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत होत्या. त्याव्यतिरिक्त कुठेही नुकसान झालेले नाही.
-----------------------------
पावसामुळे चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. (छाया : संदीप बांद्रे)
120721\1726-img-20210712-wa0046.jpg
गेल्या 24 तासात 190 मिलिमीटर पाऊस