रत्नागिरी : तालुक्यातील चाफे तिठा येथील चिरेखाणीवरील स्टोअर रूम फोडून अज्ञाताने त्यातील सुमारे ७० हजार रुपयांचे सामान लांबविले. ही घटना २३ जून २०२१ ते १७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याचा कालावधीत घडली आहे.
याबाबत चिरेखाण मालक विद्याधर शांताराम तांदळे (४८, मालगुंड बाजारपेठ, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांची चाफे तिठा येथे चिरेखाण आहे. पावसाळ्यात काम बंद असल्याने तेथे कोणीही गेले नव्हते. त्याचा गैरफायदा घेत अज्ञाताने तेथील स्टोअर रुमचे कुलूप तोडून आतमधील २० हजार रुपयांची एच. पी. इलेक्ट्रिक मोटार, १५ हजार रुपयांची एच. पी. इलेक्ट्रिक मोटार आणि १५ हजार रुपयांचे एक २४ दात्यांचे कटिंग ब्लेड असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.