खेड : खेडचे सुपुत्र अरुण प्रभू यांच्या कल्पनेतून रत्नागिरीचा हापूस आंबा थेट आयर्लंड मध्ये पोहोचला आहे. या हापूस आंब्याने आयरिश नागरिकांना भुरळ घातली असून, आत्तापर्यंत ५ हजार आंब्याची खरेदी आयर्लंड येथील नागरिकांनी केली आहे.अरुण राजन प्रभू यांनी यापूर्वीच आयर्लंड येथे स्पाईस इंडिया या रेस्टॉरंटची निर्मिती केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये भारतीयच नव्हे, तर आयरिश नागरिकही हजेरी लावतात. त्यांनी गेली दहा वर्षे गोग्रीन एक्सपोर्ट कंपनीचे सचिन कदम यांच्या माध्यमातून हापूस आयर्लंड मध्ये पाठविण्याची संकल्पना अंमलात आणली आहे.
कोकणातील रत्नागिरीचा हापूस आंबा आयर्लंड येथे ‘आस्वाद मँगो’ या नावाने अरुण प्रभू यांनी उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत तेथील नागरिकांनी ५ हजार आंब्यांची खरेदी केली आहे. आंब्याची मागणी वाढत असून, सचिन कदम यांच्या गो ग्रीन एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून हा आंबा आयर्लंड येथे पाठविण्यात येत आहे.