दापोली : रत्नागिरीतून रात्री उशिरा दापाेलीच्या दिशेने सरकलेल्या वादळामुळे अनेकांच्या काळजाचा ठाेका चुकला हाेता़ साेसाट्याचा वारा आणि वादळी पावसामुळे दापाेलीकरांच्या उरात धडकी भरली हाेती़ निसर्ग चक्रीवादळात सर्वाधिक फटका बसलेल्या पाजपंढरी गावातील लाेकांनी रविवारची रात्र जागून काढली़
तालुक्यात रविवारी रात्री आलेल्या चक्रीवादळाचा सुदैवाने फार मोठा फटका बसला नाही परंतु पाचपंढरी या ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या धोकादायक वस्तीला समुद्र उधाणाचा धोका कायम आहे़ चक्रीवादळापूर्वी पाजपंढरी गावातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या धोकादायक वस्तीला स्थलांतरित करण्यात आले होते परंतु, गावातील अनेक कुटुंबांना समुद्र व वादळ वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे़ त्यामुळेच त्यांनी रात्र जागून झाली़ खाडीमध्ये बोटीच्या रक्षणासाठी तर कुटुंबातील महिला मुला-बाळांचा सांभाळ करण्यासाठी घरी अशा परिस्थितीत आपल्या बोटीवरील मालकाची चिंता तर सोबत असणाऱ्या लेकराची चिंता अशा द्विधा मन:स्थितीत महिलांनी रात्र जागून काढली़
चक्रीवादळ शमल्यानंतर पंचनाम्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली़ ‘महसूल’चे पथक पंचनामाकरिता गावागावांत दाखल झाले हाेते़ कृषी विभाग, महसूल विभाग व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रीवादळात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता असून, पुढील सात ते आठ दिवसांमध्ये नुकसानग्रस्त पंचनाम्याची यादी तयार हाेण्याची शक्यता आहे़