शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:55 PM

Rain Rajapur Ratnagiri : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौकात पुराचे पाणी भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देजवाहर चौकात पुराचे पाणी तालुक्यात पावसाची संततधार

राजापूर : बुधवारी दुपारपासून संततधारेने कोसळणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जवाहर चौकात पुराचे पाणी भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेल्या आठवड्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, त्यावेळी राजापूर तालुक्यात पावसाने उसंत घेतली होती. काही ठिकाणी पावसामुळे किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या होत्या. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत थोडीशी वाढ झाली होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरत दुपारनंतर जोरदारपणे पडलायला सुरुवात केली आहे.बुधवारी सायंकाळी कोदवली व अर्जुना नदीच्या पाणीपातळीत मोठ्याप्रमाणावर वाढ झाली होती. रात्रभर पावसाने उसंत न घेतल्याने मध्यरात्री राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे नदीशेजारील काही दुकानांमध्ये पाणी भरले आहे. शहरात पुराची शक्यता असल्यामुळे बुधवारी सायंकाळीच बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षितस्थळी हलवला होता.मुसळधार पावसामुळे शहरातील चिंचबांध रस्ता, गुजराळी रस्ता, शिवाजीपथ रस्ता पाण्याखाली गेला आहे. मध्यरात्री राजापूर शहरातील जवाहर चौकात स्तंभापर्यंत पाणी भरले होते. सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी