शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

बाजारपुलाचे काम बंद

By admin | Published: February 10, 2015 10:53 PM

सुरेखा खेराडे : भोंगळ कारभाराला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा

चिपळूण : येथील नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरु असून सत्ताधारीही त्याला पाठीशी घालत आहेत. जुन्या बाजारपुलावरील पाईपलाईन बदलण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वीच हे काम सुरु करण्यात आले असून, नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच ठेकेदाराने हे काम कसे काय सुरु केले, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी केला आहे. आता हे काम थांबवण्यात आले आहे.दि. १ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या नगर परिषदेच्या विशेष सभेत बाजारपुलावरील जुनी पाईपलाईन काढून ती बदलण्याबाबतच्या ३०० एमएम व्यासाची ९० मीटर पाईपलाईनसाठी ६ लाख २५ हजार २७८ रुपये व ३०० एमएम व्यासाची १५० मीटर पाईपलाईनसाठी १० लाख ३७ हजार ४०२ अशा दोन्ही मिळून १६ लाख ६२ हजार ६४० रुपयांच्या खर्चाला आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मात्र, या विषयावर आवश्यक ती चर्चा सभागृहात आली नाही. मात्र, मिनिट बुकात मंजूर होऊन जाऊ दे पुढे अशी नोंद असल्याचे खेराडे यांनी सांगितले.गोवळकोट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यादृष्टीने पाईपलाईन बदलणे जरी गरजेचे असले, तरी कौन्सिलच्या मंजुरीनंतर कामाची निविदा काढून ती मागवणे गरजेचे असताना, ती मागवण्यात आली नाही. काम करताना निविदेनुसारच ते करावे असा आग्रह सदस्य धरतात व त्यानंतर ठेकेदाराकडून कामाचे कायदेशीर करारपत्र करुन काम सुरु व्हावे लागते. ही कार्यपद्धती माहिती असताना, याबाबतचे सर्व नियम धाब्यावर बसवून पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पाईपलाईन हलवण्याच्या हालचाली झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता व माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता नगर परिषदेच्या पत्र क्र.६२४ दि. १५ जानेवारी २०१५ नमूद केलेल्या पत्रातील मजकुरामध्ये पाईपलाईन बदलण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही, असे म्हटले आहे. हे काम घाईगडबडीत करण्या मागे काही तर गडबड (घोळ) आहे, असे निदर्शनास आल्यानंतर हे काम सध्या थांबवण्यात आले आहे.शिमगोत्सव येणार असल्याने, देवी करंजेश्वरी या उत्सव या जुन्या पुलावरुन होत असल्याने, नागरिकांची ये-जा होत असते. हा पूल पुन्हा सुरु होणे गरजेचे असून नियमानुसार पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असते. मात्र, सध्या काम थांबवण्यात आले असल्याने, पुलाजवळच खड्डा खोदण्यात आल्याने, पाईपलाईन बदलण्याचे काम नियमानुसार केव्हा होईल, याचीही खात्री नसल्याने शिमगोत्सवात या भागातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या कामकाजाबाबत शहरवासियांतून नाराजी व्यक्त होत आहे, असेही खेराडे सांगितले. (वार्ताहर)निविदा प्रक्रियेपूर्वीच काम सुरू चिपळूण पालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल सुरेखा खेराडे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. या प्रकरणातही त्यांनी निविदा काढण्याअगोदरच काम सुरू करण्यामागे कोणता हेतू असावा, असे विचारले आहे. खेराडे यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर, बाजारपुलावरील पाईपलाईन बदलण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली होती, ते काम थांबवण्यात आले.