लोकमत न्यूज नेटवर्क
महाड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पक्ष प्रतोद व महाडचे आ. भरत गोगावले आणि त्यांच्या पत्नीसंबंधी अश्लील संभाषण व शिव्या देणारी क्लिप व्हॉट्सॲप ग्रुपवरून व्हायरल झाली आहे. सोमवारी दिवसभर शहरात हा चर्चेचा विषय बनला होता. यासंबंधात तिघांविरुद्ध महाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत धोंडगे (रा. बेबलघर), जमीर फिरोजखान देशमुख (रा. अप्पर तुडील) व राज रघुवीर देशमुख (रा. पाचाड) अशी आरोपींची नावे आहेत. आ. गोगावले आणि जमीर फिरोजखान देशमुख यांच्यामध्ये फोनद्वारे झालेला संवाद व गोगावले दाम्पत्याबाबत अश्लील संभाषणाची क्लिप देशमुख याने धोंडगे यांना पाठविली. धोंडगे यांनी या दोन्ही क्लिप महाड चर्चामंच या व्हाॅट्सॲप ग्रुपवर पोस्ट केली. त्यावर राज देशमुखने कॉमेंटस केल्या. महिलेच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य क्लिपमध्ये असल्याने शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहरप्रमुख शेखर मोरे यांनी तिघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"