खेड : तालुक्यातील घेरापालगड राणेमाची नळपाणी योजनेच्या विहिरीच्या कामाचा शुभारंभ खेड पंचायत समितीच्या सभापती मानसी जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. या विहिरीमुळे ग्रामस्थांचा पिण्याच्या पायाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे.
घेरापालगड राणेमाची येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. माजी सरपंच सुधीर कदम, माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ कदम, सखाराम कदम सरपंच सायली कदम यांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. आमदार कदम यांनी याप्रश्नी लक्ष घालत विहीर कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. विहिरीला चार फुटांपर्यंत पाणी
लागल्याने ग्रामस्थ सुखावले आहेत.
यावेळी उपसभापती जीवन आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, उद्योजक नितीन विचारे, तालुका संघटक महेंद्र भोसले, तालुका सचिव सचिन धाडवे,
चंद्रकांत चाळके, शिवाजी शिंदे, अनंत चव्हाण, गणेश मेटेकर, राजश्री घाडगे, मनोज गोगावले, प्रवीण मोरे, अंजली भोसले, काशिनाथ शिंदे, अमित कदम, शांताराम मोरे, गंगाराम भोसले, चंद्रकांत मोरे, सुनील मोरे, प्रकाश गोगावले उपस्थित होते.