रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लवकरच विजेवरील एस.टी बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बसेस आणण्यापूर्वी चार्जिंग पाॅईंट उभारणे गरजेचे आहे. रत्नागिरी विभागातील दापोली, चिपळूण, रत्नागिरी व खेड या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबतचे जागेचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी विजेवरील बसेस राज्य परिवहन महामंडळाने वापरात आणण्याचा निर्धार केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रमुख चार आगारात चार्जिग पाॅईंट उभारण्यात येणार आहेत. चार आगारासाठी प्रत्येकी ३५ ते ३६ बसेस मिळून एकूण १३७ ते १३८ बसेस प्रस्तावित आहेत. चार्जिंग पाॅईंट उभारण्याचे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात रत्नागिरी विभागाला विजेवरील बसेस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाची प्रवाशांना नवी भेट म्हणावी लागेल.
रत्नागिरी विभागातील चार आगारातील चार्जिंग पॉईंटचे सर्व्हेक्षण पूर्ण
By मेहरून नाकाडे | Published: December 26, 2023 6:26 PM