देवरुख : आमदार शेखर निकम यांनी ५ लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असताना आंगवली लाखणवाडी-भगतवाडी या ४०० मीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था अद्यापही कायम आहे. संपूर्ण रस्त्याची चाळण झाल्याने रहदारीस त्रासदायक ठरत आहे.
सामन्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले
राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्यांचे अर्थार्जन उद्ध्वस्त झाले असतानाच आता जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. ही लाट रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी केली असल्याने सामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
आरोग्य तपासणी मोहीम पूर्ण
देवरुख : माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीचे सर्वेक्षण अखेर पूर्ण झाले आहे. यामध्ये एकूण ४२२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रत्येक ग्रामस्थाचे तापमान आणि ऑक्सिजनची तपासणी करण्यात आली.
ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
खेड : तालुक्यातील लोटे ग्रामपंचायतीच्यावतीने माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गावातील सर्व कुटुंबांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्यांनीही या मोहिमेला आपले योगदान दिले.
पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा
रत्नागिरी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत असतानाच, वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोसमी पाऊस सुरू होण्यास अद्याप महिन्याभराचा कालावधी लागणार असल्याने मे महिन्यातील उकाड्याने नागरिक घरी राहूनही कंटाळले आहेत. त्यामुळे आता पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत.