अडरे : चिपळूण नगर परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ‘माझे चिपळूण माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे़ या अंतर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यापेक्षा प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात काेरोनाचा वाढता वेग लक्षात घेता लसीकरण सुरू आहे. मात्रए लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या गर्दीमध्ये ज्येष्ठ नागरिकही रांगेत उभे असतात व सोशल डिस्टंन्सिंगही नसते़ त्यामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यातच लसीचा तुटवडा असल्यामुळे एक-दोन दिवसांनी लस येते. लस न मिळाल्याने काही नागरिकांना परत जावे लागत आहे. मोबाईल ॲपवरून नोंद करणे शक्य होत नाहीण तर कधी संकेतस्थळ सुरू झाल्यावर नोंद केल्यानंतर चिपळूणच्या माणसाला खेड तर खेडच्या माणसाला अन्य ठिकाणी लसीकरण केंद्र दिले जातेण त्यामुळे नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो. खासगी रुग्णालयात देण्यात येणारी लस शासनाने बंद केल्याने अनेकांची गैरसोय झाली आहे. ही गैरसोय लक्षात घेऊन शासनाने प्रत्येक प्रभागात जाऊन घरोघरी सर्वेक्षण करून लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.