केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविराेधात शुक्रवारी रत्नागिरीतील काॅंग्रेस भुवन येथे काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपाेषण केले. या उपाेषणाला युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित हाेते. (छाया : तन्मय दाते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी
: कें सद्ररकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे शुक्रवारी रत्नागिरीतील काॅंग्रेस भुवन येथे उपाेषण केले. या उपाेषणाला महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदाेलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी देशभरात देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. मात्र,
रत्नागिरीमध्ये काँग्रेसने उपोषण करून आपला निषेध व्यक्त केला. शहरातील
काँग्रेस भुवन येथे झालेल्या उपोषणाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विजय भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, अशोक जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी आगाशे, रिजवान शेख, अन्वर
काद्री, राकेश चव्हाण, बाळा मयेकर, हरिस शेकासन आणि कार्यकर्ते उपस्थित
होते.