रत्नागिरीत महागाईविरोधात काँग्रेसचे ‘महागाई जुमला आंदोलन’, दुचाकी आडवी करुन घातला हार तर..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 06:41 PM2022-04-26T18:41:50+5:302022-04-26T18:43:43+5:30
वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
रत्नागिरी : वाढत्या महागाईला केंद्र सरकारला जबाबदार धरत आज, मंगळवारी जिल्हा काँग्रेसतर्फेरत्नागिरीतीलकाँग्रेस भवन येथे ‘महागाई जुमला आंदोलन’ करण्यात आले. यावेळी गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. तसेच दुचाकी रस्त्यावर आडवी ठेवून हार घालण्यात आला.
वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने आज रस्त्यावर उतरत आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष विकास पाटील, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, प्रदेश महिला सरचिटणीस रूपाली सावंत, उपतालुकाध्यक्ष सुस्मिता सुर्वे, जिल्हा सरचिटणीस बंटी गोताड, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला तालुकाध्यक्ष रिझवना शेख, युवकचे चेतन नवरांगे, तालुका सचिव काका तोडणकर, प्रवीण आग्रे, महेश कुबल, केतन पिलणकर, जयवंत करमरकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन मालवणकर, जयसिंग राऊत, मनोहर आयरे, मोहन गोपाळ चव्हाण, असिफ अहमद बुड्ये उपस्थित होते.