शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

चिपळुणात काँग्रेसचा महागाई विरोधात एल्गार, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 7:02 PM

केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत अवघा परिसर दणाणून सोडला.

चिपळूण : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत अवघा परिसर दणाणून सोडला.केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये केलेली वाढ यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने घाईघाईत सुरू केलेल्या भारतीय सैन्यातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एकूणच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीला आले असून, सामान्य जनता हैराण झाली आहे. केंद्र सरकारचा कारभार उद्योजक व बड्या कारखानदारांनाच पोषक राहिला आहे. परंतु, देशातील सामान्य नागरिकांसाठी हे धोरण मारक ठरत आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवनही महागाईमुळे अडचणीत आले आहे, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, ईब्राहीम दलवाई, अन्वर जबले, अशोक डाकवे, करामत मिठागरी, राकेश दाते, वासूअप्पा मेस्त्री, यशवंत फके, माजी नगरसेविका सफा गोठे, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, अश्विनी भुस्कुटे, रविना गुजर आदी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेसInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार