रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 01:46 PM2018-12-25T13:46:10+5:302018-12-25T13:49:03+5:30

राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले.

Congress wants to strengthen hands again: Ramesh step | रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदमचिपळूण शहरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

चिपळूण : राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले.

शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात सोमवारी तालुका काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष रतन पवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, महिला तालुकाध्यक्षा गौरी रेळेकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, डॉ.विजय रिळकर, डॉ.दिपक विखारे, हिंदुराव पवार, वासु मेस्त्री, अल्पसंख्यांक अध्यक्ष बशीर फकीर, श्रीकृष्ण खेडेकर, सुरेश कातकर, सुरेश राऊत, नंदू थरवळ, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, स्नेहा सुर्वे, अ‍ॅड.जीवन रेळेकर, शांताराम बुरटे, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, माजी नगरसेवक रमेश खळे, युवती तालुकाध्यक्ष मुस्कान अडरेकर, युवक तालुकाध्यक्ष महेश कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यानिमित्ताने कामथे येथील अजित कासार, ग्रामपंचायत सदस्या अक्षता कासार, प्रशांत हरेकर, सचिन कासार आदींसह खेड येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर तालुक्यातील काही शाळांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, आपली ताकद दाखविल्याशिवाय गणती होणार नाही. जिल्ह्यात संयुक्त निवडणुका लढल्याने पक्ष तळागाळात पोहचला नाही. म्हणून आता अडचणी वाढल्या आहेत. यापुढे तालुक्यात संयुक्त दौरा करुन बैठका घेवून बारकाईने लक्ष दिले जाईल.

विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या उमेदवाराने आमच्या कार्यकर्त्यासमोर बसावे. किती निधी देणार ते जाहीर करावेत. तरच आम्ही त्यांचे काम करु. त्याशिवाय आपली दखल घेतली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आपणास स्वबळावर निवडणुका लढाव्या लागतील. तरच तळागाळात पक्ष पोहोचण्यास मदत होईल असे सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, विरोधी पक्षाच्या तुलनेत आपण खूपच मागे आहोत. याचा विचार करावा लागेल. मागचे दिवस फार उगाळून चालणार नाही. तालुक्यात आपली यंत्रणा घट्ट नाही. ती उभारावी लागणार आहे. सर्वसामान्याच्या प्रश्नावर आवाज उठवला तरच पक्ष मोठा होईल.

पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्त्यांच्या योगदानाशिवाय पक्ष मोठा होणार नाही. जुना व नवीन भेदभाव होणार नाही. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन मुराद अडरेकर यांनी केले.

Web Title: Congress wants to strengthen hands again: Ramesh step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.