लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी-दातेवाडी येथील एका घरमालकाने वीजखांबाभोवतीच घराचे बांधकाम केले आहे. हा प्रकार सुमारे गेल्या १० वर्षांपूर्वी महावितरणच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. मात्र, याकडे या विभागाने दुर्लक्ष केलेच, शिवाय आता पोलीस बंदोबस्तात हा वीजखांब नियोजित पायवाटेजवळ बसवला जाणार असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असल्याची माहिती सुधाकर दाते, संजय दाते, काशिनाथ दाते आदींनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी या सर्वांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, खेर्डी-दातेवाडी येथील ग्रामस्थाने आपल्या घराचे बांधकाम करताना वीजखांबाभोवती घराचा स्लॅब टाकला आहे. हा प्रकार आम्ही महावितरणच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सातत्याने पाठपुरावा केल्यावर वीजखांबाभोवती स्लॅब चुकीचा आहे, असे मत नोंदवले. मात्र, कोणतीही कार्यवाही केली नाही. परंतु, आता हा वीजखांब पोलीस बंदोबस्तामध्ये अन्यत्र हलविताना नियोजित पायवाटेजवळ बसवला जात आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना अडथळा ठरू शकतो. तसेच त्यांनी आपल्या जागेत अतिक्रमण केले असल्याचे मत सुधाकर दाते यांनी यावेळी नोंदवले.
------------------------------
चिपळूण तालुक्यातील खेर्डी-दातेवाडी येथील घराचे बांधकाम वीजखांबाभाेवतीच करण्यात आले आहे.
150721\1744-img-20210715-wa0019.jpg
खेर्डी दातेवाडी येथे वीज खांबाभोवतीच घराचे बांधकाम