शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मारूती मंदिर येथे नवीन शिवपुतळ्याची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 5:38 PM

रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देमारूती मंदिर येथे नवीन शिवपुतळ्याची उभारणीउदय सामंत यांचा शिवजयंतीनिमित्त संकल्प

रत्नागिरी : रत्नसिंधू योजनेअंतर्गत अथवा जिल्हा नियोजनमधून निधी घेऊन मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन तेजस्वी पुतळा उभारण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला असून, शिवजयंतीचे औचित्य साधून त्यांनी हा संकल्प केला आहे.मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची डागडुजी व परिसराचे सुशोभिकरण करण्याची मागणी शिवप्रेमींकडून अनेक दिवसांपासून होत होती. या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार रत्नागिरीतील जनतेला विश्वासात घेऊन, त्यांची मते विचारात घेऊन रत्नसिंधू योजनेअंतर्गत किंवा जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महराजांचा नवीन पुतळा बसवण्याचा मानस आहे.इतिहासकालीन संदर्भांचा अभ्यास करून, तज्ज्ञांची मते विचारात घेऊन महराजांचा एक तेजस्वी पुतळा या ठिकाणी उभारण्याचा संकल्प मंत्री सामंत यांनी केला आहे. शिवाय या परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येणार आहे.

याचबरोबर जिल्हा शासकीय रूग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथील सर्कल, जयस्तंभ, लक्ष्मी चौक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा येथील सर्कलचे देखील सुशोभिकरण करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी शिवजयंतीदिनी घेतला आहे. आमदार सामंत यांनी मारूती मंदिर येथे नवीन शिवपुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली आहे. त्यामुळे हा पुतळा उभारल्यानंतर रत्नागिरीच्या लौकिकात अधिक भर पडण्यास मदत होणार आहे. 

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीUday Samantउदय सामंतRatnagiri City Police Thaneरत्नागिरी शहर पोलीस ठाणे