लांजा : गेले चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री तसेच बुधवारी सकाळपर्यंत धुवाॅंधार पडलेल्या पावसामुळे नदी - नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली हाेती. मात्र, त्यानंतर दुपारी पावसाने विश्रांती घेतल्याने नदीपात्रातील पाण्यात घट झाली होती.
ऐन भात लावणीच्या हंगामातच पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खाेळंबली होती. मात्र, गेले चार दिवस पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. तालुक्यातील काळजी नदीच्या पाणी पातळीत वाढ हाेत असल्याचे लक्षात येताच काठावरील नागरिक सावध झाले हाेते. सकाळी ११ नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरू लागले हाेते. त्यानंतर सायंकाळी ३.३० वाजण्याच्या दरम्यान पुन्हा पावसाने जाेर धरला हाेता.