रत्नागिरी : आंबापीक लवकर घेण्यासाठी शेतकरी सर्रास कल्टारचा वापर करू लागले आहेत. आॅगस्टच्या मध्यापर्यंत काम सुरू राहणार आहे. आंब्याचे हमखास व हंगामापेक्षा लवकर पीक घेण्यासाठी शेतकरी कल्टारचा वापर करीत आहेत. अवेळची थंडी, पाऊस तसेच उच्चत्तम तापमानामुळे पिकावर परिणाम होतो. परिणामी हमखास पीक मिळविण्यासाठी कल्टार पर्याय ठरत आहे. साडेपाच ते सहा हजार रूपये दराने कल्टारची विक्री सुरू आहे. जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा कलम बागांची लागवड करण्यात आली आहे. कल्टारबरोबरच रासायनिक खताचा वापरही शेतकरी करू लागले आहेत. खतामुळे झाडाला पोषक घटक उपलब्ध होतात. शिवाय कल्टारमुळे उत्पादकता वाढते. त्यामुळे कल्टारच्या वापराशिवाय शेतकऱ्यांपुढे आता पर्याय राहिलेला नाही.जूनमध्ये शेतकऱ्यांनी कलमांना खत घालण्यास सुरूवात केली. मात्र, पावसाअभावी शेतकऱ्यांनी खत घालणे थांबवले होते. परंतु आषाढी एकादशीपासून पाऊस सुरू झाल्यामुळे खत व कल्टार घालण्याच्या कामाला वेग आला आहे. अद्याप भातशेती लागवडीचे काम सुरू असल्याने कल्टार व खते घालण्याच्या कामाला मजूरवर्ग उपलब्ध होत नाही. पावसाची उघडीप पाहून शेतकरी कल्टार घालीत असलेले दिसून येत आहेत. पाच ते साडेपाच हजार रूपये लिटर दराने कल्टारची विक्री सुरू आहे. कल्टारसाठी रोख पैसे मोजावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना कल्टार अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)-हमखास व हंगामापेक्षा लवकर पीक घेण्यासाठी शेतकरी कल्टारचा वापर.-अवेळची थंडी, पाऊस तसेच उच्चत्तम तापमानामुळे पिकावर परिणाम.
कल्टारचा वापर सुरू
By admin | Published: July 22, 2014 10:48 PM