चिपळूण : चिपळुणात संस्कृत भारती कोकण प्रांतातर्फे तालुकास्तरीय संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्ग डी. बी. जे. महाविद्यालय येथे ८ ते १८ एप्रिल दरम्यान प्रतिदिन सायंकाळी ४ ते ६, तर ‘माधवबाग’ (संघ कार्यालय), बापट आळी, चिपळूण येथे ९ ते १८ एप्रिल दरम्यान प्रतिदिन सकाळी १० ते १२ या वेळेत हाेणार आहे.
हा वर्ग केवळ चिपळूण तालुक्यातील लोकांसाठी आहेत. संस्कृतच्या कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही. कोणत्याही लेखन साहित्याची आवश्यकता नाही. मात्र, सोबत मास्क असणे आवश्यक आहे. १४ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती संभाषण वर्गात सहभागी होऊ शकते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे सर्व मार्गदर्शक नियम पाळून वर्गाचे आयोजन केले आहे. हे काम भाषा प्रचाराचे असल्याने वर्ग पूर्णतः निःशुल्क आहेत.