शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गुहागरात सहकारी संस्था कारवाईच्या कचाट्यात

By admin | Published: April 27, 2016 10:03 PM

अकरा संस्था बंद होणार? : चाळीस निष्क्रीय संस्थांना कायमस्वरुपी टाळे

शृंगारतळी : गुहागर तालुक्यातील एकूण १२६ विविध सहकारी संस्थांपैकी ४० निष्क्रीय संस्थांची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे, अकरा संस्था रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील उर्वरित संस्थांना वेळोवेळी अपडेट राहावे लागणार आहे.सहकार खात्याने सुरू केलेल्या बिनकामी संस्था स्वच्छता मोहिमेमुळे संस्था काढणाऱ्यांवरही चांगलाच लगाम ताणला गेला आहे. कार्यकुशल संस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही सहकार खात्याला यापुढे पेलावी लागणार आहे.गुहागर तालुक्यातील ४० संस्थांची नोंदणी कायमची रद्द केली आहे व अकरा संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यापुढे उठसूट संस्था उघडणाऱ्यांना या कारवाईमुळे चांगलीच चपराक बसली आहे. अवसायनात काढलेल्या गुहागरातील संस्थांमध्ये गुहागर तालुका नागरी सहकारी पतसंस्था, शृंगारतळी, ओम गंगागिरी, गिमवी बौध्दजन चिखली, लक्ष्मी अडूर, समृद्धी ग्रामीण बिगर सहकारी हेदवी, श्री दशरथ हेदवी, विविध कारागीर ग्रामीण औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था, सावित्रीबाई फुले महिला, जीवनदायी देवी महिला तवसाळ, धनलक्ष्मी नरवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्धे, अलफलाह पडवे, सिद्धिविनायक आळंबी उत्पादक सहकारी संस्था, आरे, चणकाई महिला मंडळ, चिंद्रावळे, गुहागर तालुका अपंग पतसंस्था, वेळणेश्वर, वेळणेश्वर मागासवर्गीय संस्था, गुहागर, श्री महामाई सोनसाखळी देवी महिला सहकारी संस्था, तवसाळ, धोपावे पाणीपुरवठा संस्था, धोपावे, नम्रता पर्यटन विकास, गुहागर, वंदे मातरम जलक्रीडा सहकारी संस्था, तवसाळ, गुहागर बेरोजगार सर्व सेवा सहकारी संस्था, गुहागर, श्री रामेश्वर बेरोजगार तवसाळ आगर, कालिका बेरोजगार, कर्दे, दशभूज लक्ष्मी गणेश खारभूमी विकास हेदवी, नरवण खारभूमी, नरवण, दत्तकृपा खारभूमी, पालशेत, एकलव्य स्वयंरोजगार सेवा उद्योग, तवसाळ, आदर्श स्वयंरोजगार, मढाळ, युवा आदर्श स्वयंरोजगार, गुहागर, निर्मिती स्वयंरोजगार, पडवे, मंगलमूर्ती स्वयंरोजगार, गुहागर, प्रकाश स्वयंरोजगार, तवसाळ, अंजुमन स्वयंरोजगार, अंजनवेल, संत गोरोबाकाका स्वयंरोजगार नरवण, स्वयंरोजगार सेवा अंजनवेल, गोपाळकृष्ण स्वयंरोजगार संस्था, गुहागर, जननी स्वयंरोजगार शृंगारतळी, सागरदीप स्वयंरोजगार संस्था, पालशेत, न्यू आदर्श स्वयंरोजगार संस्था, वेलदूर, राणोबा स्वयंरोजगार संस्था, गुहागर, प्रथमेश स्वयंरोजगार संस्था, गुहागर, सागररत्न स्वयंरोजगार, वेलदूर अशा अनेक संस्था सहकार खात्याने आता मोडीत काढल्या आहेत.राज्यभरात सुरू असलेल्या अशा सहकार खात्याच्या स्वच्छता मोहिमेमुळे कागदोपत्री पसारा कमी होणार असला तरी सहकारातून समृद्धीकडे जाणारी वाट मात्र अंधारमय होत चालली असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)