२. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर ३ टक्क्यांच्या खालीच राहिलेला आहे. कोरोनाबाधितांच्या मृतांचे प्रमाण कमी-जास्त होत असते. मात्र, मृतांमध्ये सर्वात जास्त पन्नाशीवरील रुग्णांची संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,९१७ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त मृत्यूंचे प्रमाण रत्नागिरी तालुक्यात असून, ६३८ रुग्ण मृत्यू पावले आहेत. मंडणगड तालुक्यात बाधित रुग्णांसह मृत्यूंचे प्रमाण कमी असून, आतापर्यंत २७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
३. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव राहणाऱ्या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कायम आहे. नागरिक स्वत:हून पुढे आले नाहीत तर दुसरी लाट नियंत्रणात येणे कठीण आहे. स्वॅब दिला की, अहवाल येईपर्यंत आयसोलेट होणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. सौम्य लक्षणे असलेले अनेकजण गृह अलगीकरणात राहतात. परंतु, निर्बंध पाळत नाहीत. बाहेर फिरत राहिल्याने संसर्ग वाढवत आहेत.