मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांनी जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण सापडले असण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये एक हजार आणि नोव्हेंबरमध्ये तर ३६० नवे रूग्ण सापडले आहेत. ही संख्या घटत असल्याने आता आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि जिल्हा हादरून गेला. सुरुवातीला एक नवीन रूग्ण सापडण्याने धास्ती वाढत होती, तिथे नंतर नंतर रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत गेली.सुरुवातीला तबलिगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थित लोक कोरोनाबाधित असल्याचे सापडले. त्यानंतर मुंबईत वाढणाऱ्या रुग्णांमुळे लाखो मुंबईकर रत्नागिरी जिल्ह्यात परत आले. तेव्हापासून रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढतच गेले. गणेशोत्सव काळात ही संख्या अधिकच जोमाने वाढली. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण वाढले.सुदैवाने ऑक्टोबर महिन्यापासून हे प्रमाण घटू लागले. १९ ऑक्टोबरपासून नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होत गेली. नोव्हेंबर महिन्यात तर हे प्रमाण अधिकच कमी आले आहे.महिनानिहाय सापडलेले रुग्ण- मार्च - ०१, एप्रिल - ०५, मे - २६४, जून - ३४४, जुलै - १२१२, ऑगस्ट - २०१६, सप्टेंबर - ३४७६, ऑक्टोबर - १०४१, नोव्हेंबर ३६०चाकरमानी आल्यानंतर..ज्या प्रमाणात चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येऊ लागले, त्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागले. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चाकरमानी गावी आले. पण त्यातील काहीजणांनी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली.रुग्णांचे वेळेवर निदानरत्नागिरीत कोरोना टेस्ट लॅब सुरू झाल्यानंतर रुग्णांचे निदान होण्याची वेळ अधिक कमी झाली. त्याआधी स्वॅब तपासणी मिरज, कोल्हापूर येथे केली जात होती. निदान वेळेवर झाल्याने आजार पसरण्याआधी रूग्णांवर उपचार सुरू झाले. आसपासच्या लोकांवरही वेळेवर उपचार झाले.माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचाही हातभारराज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम दोन टप्प्यात राबवली. आरोग्य खात्याने प्रत्येक कुटुंबाची तपासणी केली. जे लोक लक्षणे नाहीत, म्हणून तपासणीसाठी गेले नव्हते, जे लोक आर्थिक परिस्थिती नाही, म्हणून तपासणीपासून वंचित होते, अशा सर्व लोकांची तपासणी झाली. कोरोनाला रोखण्यामध्ये त्याचाही हातभार खूप मोठा होता. त्यामुळे तळागाळातील लोकांमध्ये चांगल्या प्रमाणात जागृतीही झाली.
Coronavirus Unlock- कोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 6:25 PM
CoronaVirus, Ratnagirinews कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांनी जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्ण सापडले असण्याच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये एक हजार आणि नोव्हेंबरमध्ये तर ३६० नवे रूग्ण सापडले आहेत. ही संख्या घटत असल्याने आता आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर हिटमाझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचाही हातभार