२. कोरोना महामारीमध्ये सर्वच व्यवहार, उद्योगधंदे मंदावलेले आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात या महामारीमध्ये गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत वाहन खरेदीला चांगलीच गती मिळालेली आहे. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मे आणि जून महिन्यात ८५२ वाहनांची खरेदी करण्यात आल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेमध्येही कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहन व्यवसायाला कोरोनामध्ये चालना मिळाली आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना कोरोनाने विळखा घातल्याचे समाेर आले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी जिल्ह्यात लहान मुले कोरोनाग्रस्त झाली असली तरी आरोग्य विभागाने वेळीच उपचार केल्याने ही सर्व मुले बरी झाली. मात्र, पुढे येणाऱ्या तिसऱ्या लाटेत मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याने पालकांनी अधिक दक्षता घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.