२. संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत, घाटिवळे याठिकाणी ग्राम विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने व उपसरपंच आदिती कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे, पंचायत समिती सदस्य संजय कांबळे उपस्थित होते. घाटीवळे कदमवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये हा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे.
३. खेड पीएस समूहातर्फे शहरातील खांबतळे येथील झोपडपट्टीतील रहिवाशांना कोरोनापासून बचावासाठी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रहिवाशांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली. कपडे, मास्क, सॅनिटायझर तसेच खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनाही मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. यावेळी जय पासवान, एस. सोळंके, संकल्प शिगवण, भूषण शेट्टे, आदित्य खेडेकर, ऋतिक पाटील, ओम जाधव, सागर चव्हाण, श्रवण पवार, शुभम खेडेकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.