२. खेड तालुक्यात कोरोनामुक्त तालुका करण्यासाठी माझे गाव, माझी जबाबदारी ही संकल्पना राबविण्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कोरोनाला थारा न देण्यासाठी ग्राम कृती दल कार्यरत आहेत, शिवाय लसीकरणाचा कडक कार्यक्रम राबविला जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. म्हणून तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे.
३. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभाग सतत कार्यरत आहे. त्यासाठी लोकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये ग्राहकांची अत्यावश्यक सेवेतील वस्तू खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांविरुध्द पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईने विनाकारण फिरणाऱ्यांना दणका बसत आहे.