२. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ लाॅकडाऊनला प्राधान्य देण्यात आल्यानंतरही जून महिन्याच्या २६ दिवसात जिल्ह्यात तब्बल १४ हजार ६३७ नवे रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याप्रमाणे जून महिन्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. लॉकडाऊनचा परिणाम केवळ शहरी भागात होतो. ग्रामीण भागात त्याचा फारसा परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्याने, ग्रामीण भागातील मोठ्या वस्त्यांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे.
३. पर्यटकांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरात पर्यटनाचा हंगाम वाया गेल्याने हॉटेल, लॉज व्यावसायिक चांगलेचे अडचणीत आले आहेत. मात्र, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सध्या पर्यटकांची संख्या खूपच वाढली आहे. येणारे पर्यटक उत्साहापोटी वाहने कशीही वेडीवाकडी उभी करून धबधब्याकडे पळतात. पर्यटनस्थळावर गर्दी वाढल्याने स्थानिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.