रत्नागिरी : सध्या आपण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.जर वेळ पडली तर डॉक्टर म्हणूनही जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी आहे.पण अशी वेळ येणार नाही, असाही विश्वास डॉ. प्रवीण मुंढे व्यक्त केला.कोरोनाच्या बाबतीत सामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे यांनी फेसबुक लाइव्हचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.सध्या सामान्य जनता आपल्या व पोलिसांच्या कामगिरीवर खूश असून, अनेक जणांनी आपला फोटो डीपीवर ठेवला आहे. त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते का, असा प्रश्न जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, आमच्या कामगिरीमुळे माझा फोटो डीपीवर ठेवला असला तरी सर्व पोलीस यंत्रणा कामगिरी पार पाडत आहेत. त्यामागे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे श्रेय व मेहनत आहे. माझा फोटो डीपीवर ठेवला असला तरी हा सर्व पोलीस खात्याचा सन्मान समजतो. नागरिकांकडून दाखवण्यात येणाऱ्या आपुलकीमुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळते असेही त्यांनी सांगितले.आपण स्वत: डॉक्टर आहात कोरोनाच्या उपचारासाठी गरज पडली तर आपण डॉक्टर म्हणून जबाबदारी पार पाडाल का, असा प्रश्न रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वेळप्रसंगी डॉक्टर बनूनही जबाबदारी पार पाडेन, असे सांगितले.
corona in ratnagiri-वेळ पडली तर डॉक्टर बनून जबाबदारी पार पाडू : पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 2:47 PM
सध्या आपण जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.जर वेळ पडली तर डॉक्टर म्हणूनही जबाबदारी पार पाडण्याची आपली तयारी आहे.पण अशी वेळ येणार नाही, असाही विश्वास डॉ. प्रवीण मुंढे व्यक्त केला.
ठळक मुद्देवेळ पडली तर डॉक्टर बनून जबाबदारी पार पाडू : पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेकोरोनाबाबत जनतेच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी फेसबुक लाइव्ह