२. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली, तसेच नद्यांना महापूर आल्याने त्याचा फटका अनेक गावांना बसला. चिपळूण, खेड शहरासह आजूबाजूची गावे जलमय झाल्याने लाखो लोकांचे हाल झाले. लोकांना अन्नपाण्याशिवाय दिवस काढावे लागले. अशा परिस्थितीमध्ये लोक कोरोना महामारीला पूर्णपणे विसरून गेले. अनेकांनी पूरग्रस्त धाव घेतली. त्यातच जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणालाही ब्रेक लागला. मात्र आता कोरोनाबाबत तेथे अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
३. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव गामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कोरोनाविषयक आरटीपीसीआर तपासणीला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खालगाव, जाकादेवी परिसरातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, बाजारपेठेतील व्यापारी, ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळपासून गर्दी केली होती. ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या सर्वांची कोरोनाविषयक तपासणी करण्यात आली. या मोहिमेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले.