चिपळूण : चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवारी एस. टी. बसने पनवेलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तेथून हे परप्रांतीय रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. यावेळी सोशल डिस्टनशिंगचा नियम पाळला गेला. दोन महिन्यांनी आपल्या गावी जायला मिळणार असल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार आदी प्रदेशातील मजूर नोकरीधंद्यासाठी महाराष्ट्रातील मुंबईसारख्या अन्य शहरांमध्ये येतो. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या आहे. लॉकडाऊन लागू केल्याने परप्रांतीय महाराष्ट्रात अडकून पडले आहेत. या सर्वांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे परप्रांतीय आपल्या गावी जाण्यासाठी ओरड करीत होते. शासनाने तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत योग्य ती कार्यवाही पूर्ण करून गावी जाण्यास परवानगी दिली आहे.त्यानुसार चिपळुणात अडकलेल्या मध्यप्रदेशातील ११२ मजुरांनी ऑनलाईन अर्जाद्वारे गावी जाण्यासाठी परवानगी मिळविली आहे. या मजुरांना पनवेलपर्यंत जाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार येथील प्रशासनाने एस. टी. बसची सोय केली होती. मंगळवारी सकाळी या मजुरांना एस. टी. बसने पनवेलकडे पाठविण्यात आले. तेथून मजूर रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. ही सर्व यंत्रणा प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्यासह मंडल अधिकारी व तलाठी, पोलिसांनी राबविली.
CoronaVirus Lockdown : चिपळुणातून ११२ मजूर एस. टी. ने मध्यप्रदेशला झाले रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:57 PM
चिपळुणात नोकरीधंद्यानिमित आलेले मध्यप्रदेशातील मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मंगळवारी एस. टी. बसने पनवेलकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. तेथून हे परप्रांतीय रेल्वेने आपल्या गावी जाणार आहेत. यावेळी सोशल डिस्टनशिंगचा नियम पाळला गेला. दोन महिन्यांनी आपल्या गावी जायला मिळणार असल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
ठळक मुद्देचिपळुणातून ११२ मजूर एस. टी. ने मध्यप्रदेशला झाले रवानाएस. टी. ने पोहोचणार पनवेलला, विशेष रेल्वेने जाणार गावी