रत्नागिरी : कोरोनामुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत जर कोणी दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढायला प्रशासनासोबत रस्त्यावर उतरू, असा सज्जड दम राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्यांना दिला आहे.कोकणात सुरूवातीला बाहेरून आलेला एक रूग्ण आढळला होता त्यानंतर कोकण कोरोनामुक्त होत असतानाच दिल्ली येथील मरकज या मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमातुन कोकणासह संपुर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आलेल्या लोकांमुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रत्नागिरी शहरातील राजिवडा भागात एक रुग्ण आढळून आला. तेथील माजी लोकप्रतिनिधीने आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याचा प्रकार करुन परत पाठवले याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, असे आमदार साळवी म्हणाले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस व आरोग्य यंत्रणांवर अतिरिक्त ताण येऊन ते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, दिल्लीवरून आलेले काही मुस्लिम बांधव हे प्रशासनाला सहकार्य न करता धर्माचे कारण पुढे करत दादागिरी करीत आहेत, ही वेळ आपल्या धर्माचा प्रसार नी प्रचार करायची नसून, देशाच्या हितासाठी जे जे योग्य करावे लागेल ते करायची आहे, असे सांगत त्यांनी प्रशासनाला सहकार्य न करणारा कोणीही असो त्याच्यावर कडक कारवाई करा, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे राहु, असे राजन साळवी यांनी सांगितले.
corona virus - दादागिरी मोडून काढायला प्रशासनासोबत रस्त्यावर उतरू, राजन साळवी यांचा सज्जड दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 6:13 PM
कोरोनामुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत जर कोणी दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढायला प्रशासनासोबत रस्त्यावर उतरू, असा सज्जड दम राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रशासनाला सहकार्य न करणाऱ्यांना दिला आहे.
ठळक मुद्देपोलीस व आरोग्य यंत्रणेसोबतची दादागिरी खपवून घेणार नाही दादागिरी मोडून काढायला प्रशासनासोबत रस्त्यावर उतरू, राजन साळवी यांचा सज्जड दम