रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील ८ जणांचे रविवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. रत्नागिरीत आढळलेल्या चौघांपैकी दोन महिला या आंब्याच्या टेम्पोतून रत्नागिरीत दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. टेम्पोवाल्याने महिलांना माळनाका येथे सोडल्यानंतर त्या जिल्हा रुग्णालयात स्वत:हुन दाखल झाल्या होत्या. या महिला कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता त्या टेम्पोवाल्याचा शोध यंत्रणा घेत आहे.जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत जाऊन तो ४२ वर गेला आहे. कोरोनाबाधित आढळणाऱ्या रुग्णांमध्ये मुंबईकरांचा समावेश अधिक आहे. मुंबई - वडाळा येथून आलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. या दोन महिलांनी ७ मे रोजी वडाळा येथून प्रवास सुरु केला. वडाळा ते चेंबूर असा प्रवास त्यांनी टॅक्सीने केला. चेंबूर येथून त्या आंब्याच्या टेम्पोमध्ये बसल्या. ८ मे रोजी त्या रत्नागिरीत माळनाका येथे दाखल झाल्या.७ मे रोजी सकाळी त्या स्वत:हून जिल्हा रुग्णालयात हजर झाल्या. त्यांना तत्काळ आयटीआय येथे क्वॉरंटाईन करण्यात आले. रविवारी या दोघांचा अहवाल कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या दोन महिलांना रत्नागिरीत एका आंबा वाहतूकवाल्याने आणल्याचे समोर आले आहे. त्या चालकाचे नाव त्या महिलांना माहीत नसून तो केवळ आंबेवाला होता असे त्या महिलांनी सांगितले आहे. तो टेम्पोवाला राहतो कुठे याचा शोध आता यंत्रणा घेत आहे.आंब्याची वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील अशाप्रकारची वाहतूक होत असून, जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर गाड्यांची तपासणी होते की नाही असा सवाल होत आहे. जिल्ह्यात येणारे सर्वच मार्ग बंद असताना केवळ कशेडी घाटातूनच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कशेडी घाटातून तपासणी करताच वाहने सोडली जात आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
Coronavirus in Maharashtra टेम्पोचालकाचा शोध सुरू--कोरोनाबाधित महिलांचा आंब्याच्या टेम्पोमधून प्रवास- रत्नागिरीत आढळणारे कोरोनाबाधित मुंबईकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 4:07 PM
रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातील ८ जणांचे रविवारी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. रत्नागिरीत आढळलेल्या चौघांपैकी दोन महिला ...
ठळक मुद्देमहिलांना माळनाका येथे सोडल्यानंतर त्या जिल्हा रुग्णालयात स्वत:हुन दाखल झाल्या होत्या