रत्नागिरी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, मजूर, गोरगरीब लोक अधिक संकटात सापडले आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून माणूसकीचा झरा आता वाहू लागला असून अनेकजणया लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या लोकांना मदतीचा हात आर्थिक किवा अन्नधान्याच्या स्वरुपात दिला जात आहे.रत्नागिरी शहरात अनेकसामाजिक ग्रुप, शिवसेना, भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस आणि काहीजण स्वतंत्रपणे अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देत आहेत. शहरातील भारतीय जनता पाटीर्चे प्रभाग क्रमांक १०चे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी कोरोनामुळे जनतेवर आलेल्या संकटातून धीर देण्यासाठी ढवळेवाडी, कळंबटेवाडी, खालचीआळी येथे १२० कुटुंबियांना अन्नधान्य वाटप केले. यावेळी नगरसेवक समीर तिवरेकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, भाजपा युवामोर्चा माजी अध्यक्ष मंदार मयेकर, शहर सरचिटणीस बाबू सुर्वे, संदीप रसाळ, प्रसाद फडके, रामजी भानुशाली, शिवाजी आंग्रे उपस्थित होते.रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनीही शहरातील तसेच तालुक्यातील अनेक गरजू लोकांना अन्नधान्याच्या रुपाने मदतीचा हात पुढे केला आाहे. अनेक गरीब कुटुंबे, मजूरांना त्यांनी अन्नधान्याच्या रुपात मदत केली आहे. रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये परटवणे येथे बोरकरवाडीमध्ये ३० कुटुंबे व सरोदेवाडीतील ४८ कुटुंबांना धान्य, डाळी व जीवनावश्यक वस्तूंंचे वाटप केले आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये फाळके यांच्यातर्फे मोफत पाणी पुरवठाही केला जात आहे.रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेतर्फे कोरोना संकटग्रस्तांना मदत देऊन दिलासा दिला आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांची ओढाताण लक्षात घेऊन पतसंस्थेने तत्काळ भेट म्हणून स्वरुप भेट या नावाने ह्यकिराणा पॅकेजह्ण वितरीत केले जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये हे वितरण केले जात आहे. सहकार चळवळीला अपेक्षित असे हे काम पतसंस्थेकडून सुरू असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी म्हटले आहे.गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीचाही लाभ अनेकांना मिळत आहे. रत्नागिरी शहरातील गणेश धुरी चालवित असलेल्या शिवभोजन केंद्रातून आता शिवभोजन थाळी गरजू लोकांच्या घरी पोहोच केली जात आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना, व्यक्तीकडूनही गरजुंंना अन्न-धान्याचा पुरवठा केला जात आहे.
CoronaVirus Lockdown : कोरोनाच्या संकटकाळात वाहतोय माणुसकीचा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 3:58 PM
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक, मजूर, गोरगरीब लोक अधिक संकटात सापडले आहेत. हातावर पोट असलेल्या या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून माणूसकीचा झरा आता वाहू लागला असून अनेकजणया लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भुकेल्या लोकांना मदतीचा हात आर्थिक किवा अन्नधान्याच्या स्वरुपात दिला जात आहे.
ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात वाहतोय माणुसकीचा झराअनेकांकडून स्वयंस्फुर्तीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा