रत्नागिरी : शहरातील राजिवडा येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी या भागात तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील एका माजी नगरसेवकाने पिटाळून लावले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन नागरिकांना आवाहन केले. तसेच याप्रकरणी एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पाठवली आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना येथे तपासणी करण्यासाठी एका माजी नगरसेवकाने अटकाव केला. तर येथे तपासणीसाठी आलात तर येथील माहोल बिघडविण अशी धमकी देखील दिली. यानंतर ही सर्व पथके पुन्हा परत आली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कणखर भूमिका घेत राजिवडा गाठले व येथील जनतेला पुन्हा एकदा आवाहन केले.आरोग्य पथकांना अटकाव करणाऱ्या माजी नगरसेवकाची पोलिसी भाषेत चांगली कानउघाडणी करीत या माजी नगरसेवकाला व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे चोरून व्हिडीओ शुटींग करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देण्यात आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड या सर्वांनी पुन्हा एकदा नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
CoronaVirus Lockdown : राजिवड्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लावले पिटाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 1:49 PM
शहरातील राजिवडा येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी या भागात तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील एका माजी नगरसेवकाने पिटाळून लावले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन नागरिकांना आवाहन केले. तसेच याप्रकरणी एका माजी नगरसेवकाला ताब्यात घेतले आहे. तर एका महिलेलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देमाजी नगरसेवकासह एक महिला ताब्यातचोरून व्हिडिओ शुटींग करणाऱ्याला दिला प्रसाद