रत्नागिरी : जिल्ह्यात मद्यविक्री ऑनलाईन व होम डिलिव्हरीद्वारे देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. राज्यात मद्य दुकानासमोर होणारी गर्दी पाहता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, होम डिलिव्हरीची कायद्यात तरतूद नसल्याने हा निर्णय काही तासातच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता दुकानातच मद्य उपलब्ध होणार आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांनी नवीन सुधारित आदेश बुधवारी रात्री काढला. जिल्ह्यात आता दुकानातच मद्य उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाने यापूर्वी घातलेल्या अटीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद हद्दीत स्वतंत्र ठिकाणी असलेल्या मद्य दुकानालाच विक्रीची परवानगी आहे. आता मद्यविक्रीसाठी दुकाने उघडणार असली तरी याबाबत आता दुकानदारांना अटी घालण्यात आल्या आहेत.त्यामध्ये दुकानासमोर गर्दी होणार नाही याची जबाबदारी दुकानदारांची आहे. तसेच दुकानदारांना मद्याच्या किमतीत वाढ करता येणार नाही. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९मधील तरतुदींचा भंग होणार नाही याचीही काळजी दुकानदाराने घ्यावयाची आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात या अटीत बसणारी मद्य दुकाने आता सुरू होणार आहेत.गेले दीड महिना मद्यविक्रीमुळे तळीरामांची अडचण झाली आहे. सोमवारी दुकाने सुरू होणार या आशेने तळीरामांनी सकाळी ८ वाजल्यापासून दुकानासमोर गर्दी केली होती. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोणतेच आदेश न आल्याने दुपारनंतर तळीरामांना माघारी परताव लागले होते. पण, आता दुकान सुरु होणार असल्याने तळीरामांची चिंता मिटली आहे.
CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात दुकानातच मद्यविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 11:33 AM
जिल्ह्यात मद्यविक्री ऑनलाईन व होम डिलिव्हरीद्वारे देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. राज्यात मद्य दुकानासमोर होणारी गर्दी पाहता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, होम डिलिव्हरीची कायद्यात तरतूद नसल्याने हा निर्णय काही तासातच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता दुकानातच मद्य उपलब्ध होणार आहे.
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात दुकानातच मद्यविक्रीहोम डिलिव्हरीचा निर्णय रद्द, दुकानदारांनी केली तयारी सुरू