रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत सर्वसामान्य लोकांना जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्यानुसार सोमवारी ओखावरून निघालेली पार्सल ट्रेन सोडण्यात आली होती. ही गाडी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोहचली. या ट्रेनमधून गुजरातमधून औषधांचा साठा रत्नागिरीतील मेडिकलसाठी आणला गेला.रत्नागिरी स्थानकावर हा माल या पार्सल ट्रेनमधून उतरवण्यात आला. रत्नागिरीला हा माल उतरवून ही गाडी कणकवलीच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर ही गाडी मडगाव आणि उड्डपी या स्थानकांवर थांबवणार आहे. ही गाडी तिरूअनंतपुरमपर्यंत धावणार आहे.
इथं पोहचल्यानंतर ही गाडी पुन्हा २४ एप्रिलला तिरुअनंतपुरम येथून निघून १.२० वाजता उड्डपी, ६.१० वाजता मडगाव, रात्री ८.५० वाजता कणकवली, तर ११.१० वाजता रत्नागिरी स्थानकात येणार आहे.आंबा पेट्या जाणारकोकण रेल्वे मार्गावर धावत असणाऱ्या या गाडीतून आंब्याची वाहतूकही करण्यात येणार आहे. परतीच्या वेळी रत्नागिरीतून किमान २ हजार पेट्या आंबा या स्पेशल पार्सल ट्रेनमधून जाईल असा अंदाज कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.