रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला सध्या तडे गेले असून पूर्ण वाडी भीतीच्या छायेखाली वावरत आहे. गेल्या तीन वर्षापासून येथील डोंगराला तडे गेले असून पावसाळ्यापूर्वी प्रशासन त्यांना स्थलांतरितेच्या नोटीस देते. परंतु त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली प्रशासनाकडून होत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
हल्लीच घडलेली इर्शालवाडी घटना घडलेली अशी घटना येथे होण्याची प्रशासन वाट बघत आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. कोकणात सध्या पावसाला जोर असून अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील काही घरांना तडे देखील गेले आहेत. स्मशानभूमीची जागा 3 फूट खचली आहे असे येथील ग्रामस्थ सांगतात. असे असताना या हा हाडामासाच्या लोकांचा प्रशासनाने विचार करून येथील ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.