राजापूर : शासनाचा आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी शहरातील दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत; तर पाचजणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या दंडात्मक कारवाईतून एक लाख ३७ हजार रकमेची वसुली झाली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश असतानाही बुधवारी शहरातील दोन कापड व्यावसायिकांची दुकाने उघडी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनाला आहे आणि पोलिसांनी तत्काळ त्या दोन्ही व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. नियमबाह्य दुकाने उघडल्यामुळे पोलिसांनी पाचजणांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. राजापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांत राजापूर पोलिसांनी केलेल्या विविध प्रकारच्या दंडात्मक कारवाईतून जवळपास एक लाखापेक्षा अधिक रक्कम वसूल झाली आहे. आस्थापना व ट्रॅव्हल्स मालकांविरुद्ध केलेल्या दंडात्मक कारवाईतून सुमारे ४७ हजार रुपये; तर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल ९० हजार रुपये अशी एक लाख ३७ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत.