शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
5
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
6
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
7
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
8
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
9
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
10
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
11
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
12
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
13
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
14
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
15
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
16
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
17
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
18
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
19
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

'माझ्या आई-वडिलांवर केलेली टीका मनाला लागलीय, संबंधितांना...' उदय सामंतांचं थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 8:55 PM

Crime News: माझ्या आईवडिलांवर झालेली टीका मला लागली. त्याचे उत्तर संबंधितांना एप्रिल २०२४ च्या निवडणुकीतच उत्तर देईन, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता दिला.

रत्नागिरी - वेगळी भूमिका घेतल्यानंतर माझ्यावर खूप टीका झाली. त्याला मी भीक घालत नाही. मात्र माझ्या आईवडिलांवर झालेली टीका मला लागली. त्याचे उत्तर संबंधितांना एप्रिल २०२४ च्या निवडणुकीतच उत्तर देईन, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता दिला. जर हे उत्तर मी दिले नाही तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असेही ते म्हणाले.

रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शुक्रवारी रात्री दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यात एकही तरुण, तरुणी बेरोजगार राहणार नाही, अशी ग्वाही देतानाच त्यांनी विविध प्रकल्प कोकणात आणण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमात गुवाहाटी दौऱ्याचा उल्लेख झाला. तो धागा पकडून मंत्री सामंत म्हणाले की, मी गुहावाटीला जाताना एकट्याने गेलो. कळपाने गेलो नाही. जाण्याच्या आधी चार दिवस मी जोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मी गुवाहाटीला गेलो.

शिंदे यांना लांब ठेवलेआपल्याला ठाकरे कुटुंबाबद्दल आजही नितांत आदर आहे. गुहावाटीला जाण्याआधी आपण कोणीही तुटू नये, यासाठी प्रयत्न करत होतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा चांगला माणूस जाता नये, असे मी परोपरीने समजावत होतो. मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या काही लोकांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांच्यापासून लांब ठेवले. त्यांना भेटूच दिले नाही, असा आरोपही मंत्री सामंत यांनी केला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv Senaशिवसेना