फोटो नं.
१५आरटीएन०२.जेपीजी
फोटो कॅप्शन
गुहागर तालुक्यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : गुहागरतालुक्यातील सातही लसीकरण केंद्रे ७ एप्रिलपासून बंद होती. तालुक्यासाठी १३५० लसीचे डोस उपलब्ध झाल्याने गुरुवारी सकाळपासूनच लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
महिनाभरापूर्वी ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जात होते. त्यानंतर ४५ वर्षांपुढील वयोगट लसीकरण सुरू केले. यावेळी कोरोना वाढीचा वेग कमी होता तसेच आलेली लस किती सदोष आहे याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असल्याने सुरुवातीला जास्त प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, वेगाने रुग्णसंख्या वाढत पुन्हा एकदा कोरोनाची भीतीही वाढली आहे. त्यातूनच लस घेण्याकडेही लोकांचा कल वाढला आहे.
७ एप्रिलपासून लसीचा तुटवडा असल्याने तालुक्यातील तळवली, कोळवली, हेदवी, चिखली व आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र, वेळंब उपकेंद्र व गुहागर ग्रामीण रुग्णालय अशी सातही केंद्रे, वेळंब उपकेंद्र व गुहागर ग्रामीण रुग्णालय अशी सातही केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. लस उपलब्ध होताच गुरुवारी लसीकरण केंद्र सुरू झाल्याचे समजताच मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
तालुक्यासाठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २५० व गुहागर ग्रामीण रुग्णालयासाठी १०० अशी १३५० लसीचे डोस मंगळवारी प्राप्त झाले. मागील लसीकरणाच्या सरासरीनुसार उपलब्ध डोस तीन दिवस पुरतील, असा अंदाज होता. मात्र, मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी झाल्याने उपलब्ध डोस एकाच दिवसात संपतील, अशी स्थिती होऊन पुन्हा एकदा लस नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ येणार आहे.
........................................
अपेक्षेबाहेर लसीकरणासाठी गर्दी होत आहे. हा साठा केवळ एक दिवस पुरेल एवढाच आहे. अद्याप नवीन लसीचा पुरवठा कधी होणार याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना आलेल्या नाहीत.
- देवीदास चरके, तालुका आरोग्य अधिकारी.