अडरे : चिपळूण हे नटवर्य काशिनाथ घाणेकर यांची भूमी आहे. या शहरातून नाट्य क्षेत्रातील अनेक कलाकार तयार होत आहेत. परंतु, येथील नाट्यगृह बंद ठेवणे ही चिपळूणच्या कलाकारांच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केली. शनिवारी सायंकाळी ५ वाजता अभिनेते किशोर कदम यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला भेट देऊन पाहणी केल्यानंतर सांस्कृतिक केंद्राजवळील पारावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, संजीव अणेराव, प्रकाश सरस्वती गणपते, रमाकांत सकपाळ, सुनील खेडेकर, सुनील जोशी, ऋजुता खरे, अभय दांडेकर, राजन इंदुलकर, संतोष तांबे, हेमराज भगत, शिवाजी शिंदे, प्रताप गजमल, जाफर गोठे, युवराज मोहिते आदी उपस्थित होते. अभिनेते कदम हे केंद्राची पाहणी करताना नगराध्यक्षा होमकळस व नगर परिषदेचे अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले की, मे महिन्यापर्यंत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे काम पूर्ण होऊन पडदा उघडेल, अशा पद्धतीने वेगाने काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुंबई येथील नाट्यगृहाच्या धर्तीवर या केंद्राचे काम सुरु आहे. २००५च्या महापुरामध्ये सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत ते बंद आहे. मात्र, आम्ही चिपळूणकर या सामाजिक संस्थेतर्फे नाट्यगृह लवकरात लवकर सुरु होण्यासाठी केंद्राजवळील पारावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सुरु होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. चिपळूण ही सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक कलाकार घडत आहेत. गाव समृध्द होण्यासाठी सांस्कृतिक केंद्र आवश्यक आहे. सध्या माझे २ मराठी चित्रपट येत आहेत व हिंदी नाटकांमध्ये काम सुरू आहे. राजनिती, करोडे में ही नाटके येणार आहेत. चांगले अभियंता असतील तर नाट्यगृह चांगले होईल, असे अभिनेते कदम यांनी सांगितले. (वार्ताहर) अनेक कलाकार : वेगाने काम सुरू ४चिपळूण हे नटवर्य काशिनाथ घाणेकर यांची भूमी. ४शहरातून नाट्य क्षेत्रातील कलाकार तयार होत आहेत. ४सांस्कृतिक केंद्राजवळील पारावर साधला संवाद. ४वेगाने काम सुरू असल्याची नगराध्यक्षांची माहिती.
सांस्कृतिक केंद्र बंद हे कलाकारांसाठी दुदैवाचे
By admin | Published: August 21, 2016 10:30 PM