खेड : तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड-रसाळगड मार्गावर गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. झापाडी आणि निमणी या दोन गावांच्या मध्ये ही घटना घडली असल्याने या मार्गावरील गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला.पावसामुळे भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हळवी भातशेती कापणीला आली असतानाच पावसामुळे भातशेती धोक्यात आली आहे. त्यातच गुरुवारी पहाटेच्या वेळी रसाळगडाकडे जाणाºया रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.खेड - रसाळगड या मार्गावर झापाडी, निमणी, रसाळगड ही गावे आहेत. या गावातील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी खेड शहरात यावे लागते. मात्र, दरड कोसळून रस्ताच बंद झाल्याने या गावातील ग्रामस्थांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे.रसाळगड हा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. त्यामुळे पावसाळ्यातही या गडावर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, आता हा रस्ताच बंद झाल्याने पर्यटकांचीही गैरसोय झाली आहे.
खेड-रसाळगड मार्गावर कोसळली दरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:56 PM
खेड तालुक्यात दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खेड-रसाळगड मार्गावर गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. झापाडी आणि निमणी या दोन गावांच्या मध्ये ही घटना घडली असल्याने या मार्गावरील गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला.
ठळक मुद्देखेड-रसाळगड मार्गावर कोसळली दरडरस्ताच बंद झाल्याने पर्यटकांचीही गैरसोय