शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

डाटा आॅपरेटर्सनी राबविले स्वच्छता अभियान

By admin | Published: November 19, 2014 9:11 PM

शासनाविरोधात अशीही गांधीगिरी

चिपळूण : नियमितपणे मासिक वेतन मिळण्यासाठी अनेकदा संघर्ष करुनही जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील डाटा आॅपरेटर्सना एकदाही वेळेत मासिक वेतन मिळालेले नाही. शासन सेवेत कायम करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरु केलेले ठिय्या आंदोलन आज (बुधवारी) तिसऱ्या दिवशी सायंकाळी स्वच्छता अभियान राबवून संपविण्यात आले. मात्र, कामबंद आंदोलन सुरुच राहणार आहे. महाआॅनलाईन कंपनीस ग्रामपंचायतीची कामे संगणकीकृत करण्याचा ठेका दिला होता. प्रत्यक्षात शासनाकडून महाआॅनलाईन कंपनीला ८ हजारांचे वेतन दिले असताना आॅपरेटर्सना मात्र ३५०० रुपये व ३८०० रुपये वेतन दिले जाते. तेही वेळेत मिळत नाही. त्यामुळे वैतागलेल्या डाटा आॅपरेटर्सनी मागील महिन्यात बेमुदत कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने बंद मागे घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात मागण्यांबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व डाटा आॅपरेटर अध्यक्ष गौरी मालप, रसिका लिबे, आरती साळवी, रुची सुर्वे आदींच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला बसले होते. आज मंत्रालयात ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी चौकशी समिती स्थापन करुन अहवाल मागविला आहे. याबाबत १० दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरु करण्याचा निर्णय डाटा आॅपरेटर्सनी केले आहे. दरम्यान, आॅपरेटर्सनी शासनाविरोधात गांधीगिरी करत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)