दापोली : तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता ,तसेच जोपर्यंत डॉक्टरांवर सदस्य जोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.याबाबत सविस्तर वृत्त असे की टेटवली गावातील मळेकर वाडी येथील पंकज कदम या युवकाला मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विषारी सर्पदंश झाला हा साप चावल्यानंतर पंकज याने स्वतः साप मारून भावंडांना उठवले व भावंड व काका यांच्या मदतीने दापोली शहरातील उपजिल्हा रुग्णालय गाठले मात्र येथे आल्यानंतर चार तास झाले तरी डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित झाले नाही यानंतर एक डिलिव्हरीची केस पाहण्यासाठी डॉक्टर आले असता त्यांनी पंकज जी अत्यवस्थ अवस्था पाहून त्याला तातडीने येथून हलवा असे नातेवाइकांना सांगितले यानंतर नातेवाईकांनी शहरातील एका खाजगी दवाखान्यात त्याला तपासून पुढे चिपळूण येथील डेरवण रुग्णालय गाठले परंतु तोपर्यंत पंकजचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी सायंकाळपर्यंत दापोली पोलिस स्थानकासमोर हे आंदोलन केले होते , रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम दापोली पोलिस स्थानकात सुरू होते , वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवानंद चव्हाण यांनी हलगर्जी पणाचा अहवाल दिल्याने सात वाजता नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातून बुधवारी रात्री 10 वाजता प्रेत बाहेर काढले , व टेटवली गावी घेऊन गेले , टेटवली गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले .पंकज उत्कृष्ट कबड्डीपटू कुमार.पंकज मनोज कदम इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने आकस्मित आज दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी डॉक्टरांचे योग्य उपचार न झाल्यामुळे मृत्यू झाला , असे प्रथम दर्शनी आढळून आल्याने बोलले जात आहे , परंतु पोलीस तपासात सत्य काय आहे ते उघड होईल .. डॉ. विश्राम रामजी घोले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाकवली चे माननीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी पंचक्रोशीतील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली शाळेने एक उत्कृष्ट कबड्डीपटू व आदर्श विद्यार्थी गमावला आहे.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दापोली तालुक्यातील युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 5:24 PM
दापोली : तालुक्यातील टेटवली येथील पंकज कदम या युवकाचा सर्पदंश झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयातिल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी ...
ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दापोली तालुक्यातील युवकाचा मृत्यू मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी नातेवाईकांनी घेतली भूमिका