गणपतीपुळे : जुन्या नळपाणी याेजना दुरुस्त करण्याबराेबरच प्रत्येक कुटुंबाला ५५ लिटर पाणी देण्याचा निर्णय जलजीवन याेजनेअंतर्गत आयाेजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात जल जीवन मिशन आराखडा तयार करण्यासाठी बैठकीचे आयाेजन केले हाेते. या बैठकीत पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
जलजीवन योजनेचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी कोतवडे व वाटद जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच या बैठकीला उपस्थित हाेते. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळपाणी जोडणी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती संजना माने, पंचायत समिती उपसभापती उत्तम सावंत, जिल्हा परिषद सदस्या साधना साळवी, माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, उत्तम मोरे, पंचायत समिती सदस्य मेघना पाष्टे उपस्थित हाेते.
त्याचबराेबर कार्यकारी अभियंता ऋषभ उपाध्ये, शाखा अभियंता अमोल दाभोळकर, सचिन पोटुडे, विस्ताराधिकारी नरेंद्र पराते, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रदीप घडशी, गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी ठावरे, सारिका भिडे उपस्थित होते.
ही बैठक पार पाडण्यासाठी ग्रामसेवक नाथा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गुरव, ऋषिकेश माने, मोहन माने, मिलिंद माने या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.