चिपळूण : महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात कोकणातील अनेक चालक वाहक उपस्थित होते. अनेक नवीन कर्मचाऱ्यांनी एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला. कोकण प्रादेशिक सचिव प्रमोद नलावडे व विभागीय सचिव शैलेंद्र सुर्वे यांनी त्यांचे स्वागत केले. पुणे येथील अधिवेशनात पर्यटनमंत्री दिवाकर रावते यांनी एस. टी. चालक वाहकांच्या अनेक मागण्यांचा उहापोह केला. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत देण्याचे तसेच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आरोग्य विमा असावा, प्रवासी कर १० टक्क्यांवर आणणार, कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला ५ लाखाची मदत आदी गोष्टी जाहीर करतानाच पर्यटनमंत्री रावते यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांनी वाहतुकदाराशी साटेलोटे करणे, एस. टी. तिकीटावर हात मारणे बंद करावे, असे आवाहन केले. पगार कमी असल्याने अनेक कर्मचारी नोकरी सोडून जातात, तर अनेक लोक जीवावर बेतेल असा ओव्हरटाईम करतात. काही अधिकारी आपल्या मर्जीतील कामगारांना ओव्हरटाईम देतात. पण, हे सर्व प्रकार आता बंद होणार आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला समान ओव्हरटाईमची संधी मिळायला हवी, असे धोरण आखण्यात आले आहे. करारापोटी ५ टक्केप्रमाणे कपात करुन कर्मचाऱ्यांच्या पगारातील १८ कोटींची रक्कम महामंडळाकडे जमा आहे. न्यायालयाने ते परत करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र, हा निर्णय अमान्य करुन मान्यताप्राप्त संघटना उच्च न्यायालयात गेली आहे. या संघटनेची सदस्य संख्याही मोठी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची हित लक्षात घेऊन ते पैसे परत करण्याचे आवाहन केले. एस. टी. सुदृढ करण्यासाठी मॅकेनेकची भरती केली जाईल, असे रावते यांनी स्पष्ट केले. मेकॅनिकची भरती केली जाणार असल्याने अनेक वर्षांची मागणी मान्य करण्यात येत आहे.अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सेनेचे सर्व मंत्री कामगारांच्या पाठीशी उभे राहतील; सत्ता, ताकद व प्रतिनिधीत्त्वाचा वापर करुन एस.टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला आमचे प्राधान्स असेल असे सांगितले. यावेळी देसाई यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध कामगार संघटना आणि पक्षातील शेकडो एस. टी. कर्मचाऱ्यांनी एस. टी. कामगार सेनेत प्रवेश केला.(प्रतिनिधी)
कामगार सेनेच्या अधिवेशनात निर्णय
By admin | Published: February 24, 2015 10:07 PM