लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी मृतांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यात ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ७३ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. १२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १,२०२ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुक्तीच्या दरासह मृत्यूचा दरही वाढला आहे. जिल्ह्यात दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,३५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात ७२,६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३५ टक्के आहे.
जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या प्रमाणात घट झाली आहे. केवळ २,२६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये राजापूर तालुक्यात २४ तासात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. तर मंडणगड तालुक्यात २, दापोलीत ६, खेडमध्ये ७, गुहागरात १०, चिपळुणात १५, संगमेश्वरात ५, रत्नागिरीत २४ आणि लांजात ४ रुग्ण सापडले. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २३ रुग्ण आणि ॲंटिजन चाचणीत ५० रुग्ण आढळले. आजपर्यंत जिल्ह्यात आजपर्यंतच्या चाचण्यांमध्ये एकूण ७६,१८० रुग्ण सापडले.