२. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दराप्रमाणे ऑक्सिजन व्याप्त बेडची टक्केवारी ४२.१९ टक्के आहे. हा जिल्हावासीयांना दिलासा आहे. मागील महिन्यामध्ये ऑक्सिजन बेडचे प्रमाणे ६७ टक्क्यावर पोहोचले होते. मृत्युदरही ३.३९ टक्क्यावर पोहोचला होता. दररोज १५ ते २० मृतांच्या नोंदी करण्यात येत होत्या. वेळेत रुग्ण दाखल होऊ लागल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे आणखी शिथिलता देताना ऑक्सिजन व्याप्त बेडस् ५० टक्के कमी असल्याचा विचार प्रशासन करू शकते.
३. रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रात प्रभागनिहाय लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. डोसची उपलब्धता होताच लसीकरणाचा पुढील टप्पा जाहीर केला जाणार असून तोपर्यंत प्रभागातील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. रत्नागिरी नगर परिषद आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभागनिहाय लसीकरण करताना ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना प्राधान्य देण्यात आले होते. लसीकरणाची केंद्रे प्रभागापासून दूर असल्याने या सर्वांना इच्छा असूनही या मोहिमेचा लाभ घेता आलेला नाही.