रत्नागिरी : येथील कांचन डिजिटल गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. रत्नागिरी तालुक्यातील मिरजाेळे येथील दीपक मेस्त्री यांनी साकारलेल्या जनाबाई या चलचित्राने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
कोरोनामुळे ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी तालुका मर्यादित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ६८ स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते. दहा अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली. दहा विजेत्यांपैकी शहरातील २ व ग्रामीण भागातील ८ अंतिम विजेते ठरले. जनाबाई हे चलचित्र मिरजोळे येथील दीपक मेस्त्री यांनी साकारले होते, त्यांना प्रथम क्रमांकाचे ५००० रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. कुवारबांवचे जीवन कोळवणकर यांनी ‘सौरऊर्जा महत्त्व’ हा देखावा सादर केला होता, त्यांना दि्वतीय क्रमांकाचे ३००० रुपये व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. मावळंगे येथील अजय पारकर यांच्या सुंभ सजावटीपासून देखाव्याला तिसऱ्या क्रमांकाचे रोख रक्कम २००० रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष उल्लेखनीय पारितोषिक संजय वर्तक (कुवारबांव), प्रशांत पारकर (जुवे) यांना प्रत्येकी रोख १००० रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक आशिष तरळ (कसोप), ओंकार कांबळे (मिऱ्या), रजनीश वासावे (गावडे-आंबेरे), जयदीप सावंत (सडामिऱ्या), अनिल गोताड (कोतवडे) यांना प्रत्येकी रोख ५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अभिजित नांदगावकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, संपर्क युनिक फाैंडेशनचे जिल्हाध्यक्ष नीलेश नार्वेकर, उद्योजक मनोज गुंदेचा, मूर्तिकार आशिष संसारे, जयंत मालगुंडकर, छायाचित्रकार गुरू चौगुले, संपर्क युनिक फाैंडेशनचे उपाध्यक्ष शकील गवाणकर, मंथन मालगुंडकर, अजिंक्य सनगरे, आदेश मयेकर, शुभांगी मोरे, ओंकार रहाटे उपस्थित होते.
प्रारंभी धनश्री नागवेकर, मिताली भिडे आणि सहकारी यांनी गणेशवंदना सादर केली. कांचन मालगुंडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन गौरी सावंत यांनी केले, तर आभार शकील गवाणकर यांनी मानले.